Vasturaviraj

A Trusted name in Vastushastra

रेकी व वास्तुशास्त्र

असं म्हणतात की 84 लक्ष योनीतून प्रवास केल्यानतंरच मनुष्य जन्म प्राप्त होतो.  म्हणजेच हजारो पुण्य कर्म केल्यानंतरच आपल्याला ईश्वराच्या कृपाप्रसादाने मनुष्य जन्म लाभतो.  व त्यासोबत आपल्याला मिळालेले निरोगी शरीर ही सुध्दा त्या परमेश्वराची अमूल्य देणगीच आहे.

खरंतर निसर्ग व मानवाचे नाते पहिल्यापासूनच अतूट आहे.  मनुष्याचा जन्म निर्सगात होतो व अंती ही तो निसर्गातच विलीन होतो.  निसर्गातील तत्वांवरच मनुष्याचे शरीर आधारलेले आहे.  त्यामुळे या निसर्ग नियमांचे उल्लघंन करुन मानव निसर्गाचे असंतुलन स्वतःच्या हातानेच निर्माण करीत आहे.  त्याच वेळेस इतर प्राणीमात्र निसर्ग नियमांचा उचित आदर करुनच जगत आहेत.

आपली संपूर्ण सृष्टी ही निसर्गाच्या पाच तत्वांनीच तर बनलेली आहे.  ज्याला आपण पंचमहाभूते असे संबोधितो.  ही पंचमहाभूते अर्थात पृथ्वी, जल, अग्नी, वायु व आकाश. जेव्हा आपण आपल्या शरीरातील या पाच तत्वांचा समतोल योग्य प्रकारे राखतो तेव्हा आपल्याला आरोग्यमय जीवन जगता येते.  व हा समतोल राखण्यासाठी रेकी हे एक माध्यम आहे पण रेकी म्हणजे काय?  रेकी ही एक निसर्गातीलच शक्ती आहे.  संपूर्ण विश्वात पसरलेली आहे जिला आपण वैश्विक उर्जा असे म्हणतो. ही शक्ती इतकी प्रभावी आहे की, केवळ हाताच्या स्पर्शाने आपण शारिरीक व मानसिक व्याधी दूर करु शकतो.

मनुष्याच्या शरीरात 7 प्रमुख शक्ती केंद्र असतात.  ज्यांना चक्र म्हटले जाते.  सहस्त्रार चक्र, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र, अनाहत चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, व मुलाधार चक्र ही सात चक्र आपल्या शरीरातील विविध अवयवांवर नियंत्रण ठेवून त्यांचे संतुलन राखतात. या चक्रांना विशिष्ट प्रकारे गतीमान करुन क्रियाशील केले जाते आणि विश्वव्यापी रेकी शक्तीशी आपण एकरुप होतो.  पण ही प्रक्रीया गुरुच्या मार्गदर्शनाखालीच करणे अत्यंत महत्वाचे असते.  ज्याला ऍटयुनमेंट (रेकी दीक्षा)  असे म्हटले जाते.  अशाप्रकारे योग्य गुरु कडून रेकी दीक्षा घेणारी व्यक्तीच रेकी शक्ती ग्रहण करु शकते, दुसऱ्यांना रेकी देऊ  शकते व आयुष्यभरासाठी ती रेकीचे माध्यम बनून जाते.

आपल्या शरीरातील सात चक्रांपैकी पहिली दोन चक्र सहस्त्रार चक्र व आज्ञा चक्र यांचा संबंध आपल्या अध्यात्मिक शक्तीशी येतो व उर्वरीत पाच चक्र आहेत ती पंचमहाभूतांशी जोडली गेलेली आहेत.  आपल्या शरीरातील एका ही तत्वाचे असंतुलन झाल्यास आपण आजारी पडतो.  रेकीद्वारा आपली सात ही चक्र संतुलित राखली जातात व आपण व्याधीमुक्त जीवन जगतो.  फक्त शरीरावरच नाही तर मन व आत्मा यांचे ही संतुलन राखणे रेकीमुळे साध्य होते.

ज्याप्रकारे ही संपूर्ण सृष्टी, आपले शरीर हे पंचमहाभूतांपासूनच बनलेले आहे त्याचप्रमाणे आपले घर हे सुद्धा याच पाच तत्वांनी बनलेले आहे.  प्रत्येक तत्वाचे आपल्या घरातील स्थान हे निश्चित असते अंतर्गत रचनेत जर या तत्वांच्या स्थानात बदल झाल्यास घरात संकटांची मालिका सुरु होते.  निर्सगाच्या नियमांनुसार घर किंवा कुठलीही वास्तु बनविणे म्हणजेच वास्तुशास्त्र.

साधारणतः कुठल्याही वास्तुची निर्मिती करताना काही नियम, सिद्धांत असतात ज्यांना वास्तुशास्त्र म्हटले जाते.  वास्तुशास्त्रात पंचमहाभूते, दिशा, उपदिशा, भौगोलिक परिस्थिती, पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती, विदयुत चुंबकीय शक्ती, विविध ग्रहांद्वारे प्राप्त होणारी वैश्विक शक्ती या साऱ्यांचा अभ्यास केला जातो ताप्तर्य असे की, वास्तुशास्त्र म्हणजे निसर्गातील विविध घटकांचा समन्वय व सुसंवाद घडविणारे शास्त्र.

वास्तुशास्त्र हे हजारो वर्षापूर्वी आपल्या ॠषी मुनींनी त्यांच्या प्रर्दीघ तपश्चर्येतून, अभ्यासातून साकारलेले आहे. ज्यायोगे मानवाचे जीवन सुख – शांतीत व्यतीत व्हावे. वास्तुशास्त्रात चार मुख्य दिशा, पुर्व, पश्चिम, उत्तर , दक्षिण व चार उपदिशा ईशान्य, अग्नेय, नैॠत्य व वायव्य यांचे फार महत्व आहे.  याच सोबत घराच्या केंद्रबिंदू (मध्य) याचे ही अनन्य साधारण महत्व आहे.  प्रत्येक दिशेचे पंचमहाभूतांशी संतुलन ठरलेले असते त्यामुळे आपली गृहरचना ही वास्तुशास्त्रानुसार करणे त्या वास्तुसाठी फलदायी ठरते.

नवीन वास्तुनिर्मिती करताना वास्तुशास्त्रानुसार रचना करणे सहज शक्य असते.  परंतु अस्तित्वात असलेल्या वास्तुत ही विनातोडफोड उपाययोजना यंत्र, मंत्र इत्यादी च्या सहाय्याने आपली वास्तु दोषमुक्त करता येते.

शेवटी हेच सिध्द होते की मानवाला जर आपला उत्कर्ष साधायचा असेल तर निर्सगाच्या नियमांचा आब राखला जाणे महत्वाचे ठरते.  यासाठीच निसर्ग, आपले शरीर व आपले घर यातील पाचही तत्वांचा समतोल रेकीद्वारे साधून आपण आपल्या आयुष्यात सुख, शांती, समृध्दी, वैभव व आरोग्य आणू शकतो.

सौ. मंजुश्री अहिरराव

Advertisements

Single Post Navigation

One thought on “रेकी व वास्तुशास्त्र

  1. Aaplya matashi mi purn sahmat aahe,karan mla yacha majhya rojchya aayushyat khup upyog hoto aahe. Aani tyabaddal mi tumchi aabhari aahe.bhovryat adaklelya hodila tumhi disha dakhavli tyamule ti bharkatnya eivaji saral margavar aali.THANKS a LOT

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s

%d bloggers like this: