Vasturaviraj

A Trusted name in Vastushastra

महिला सक्षम झाल्यास कुटुंब सुधारेल

जगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही.

जगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही. शिकलेली आई घर पुढे नेई, असे म्हटले जाते, त्यामागे तेच कारण असते. महिला सशक्तीकरण झाले, तर कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. मुले शाळेत जातील. शेतीचे उत्पादन वाढेल आणि एकूण कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावेल.

संयुक्त राष्ट्रांच्या कमिशन ऑन स्टेटस ऑफ विमेन (सीएसडब्यू)ने या वर्षी ‘ग्रामीण महिलांचे सशक्तीकरण आणि त्यांची दारिद्र्यनिर्मूलन व विकासातील भूमिका’ या विषयावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे साहजिकच ग्रामीण महिला आणि त्यांची सामाजिक स्थिती या विषयाची चर्चा सुरू झाली आहे.

स्त्री घराचा आधार असते. घराची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेणारी पहिली व्यक्ती ही त्या घरातील स्त्री असते. खेड्यापाड्यांतील स्त्रीचे विश्व चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित असते, असे म्हटले जाते. स्त्री चार भिंतींच्या आत बंदिस्त असते, हे सांगण्यासाठी चूल आणि मूल ही संकल्पना वापरली जाते. त्यापलीकडे जाऊन विचार केला तर घरातल्या एकूण खाण्या-पिण्यावर स्त्रीचे वर्चस्व असते. या वर्चस्वातून तिचा अधिकार सिद्ध होत नाही, ही त्याची दुसरी बाजू आहेच. तरीही जेवणासाठीची सारी जमवाजमव स्त्रीच करीत असते. इंधन मिळवणे, ही तिचीच जबाबदारी असते आणि पाणी भरण्याचे कामही तिलाच करावे लागते. जेवण बनवण्यासाठी तर तिच्याशिवाय पर्याय नसतो आणि कुणाला हवे नको ते ताटात वाढण्याची जबाबदारीही तिचीच असते आणि पिढ्यान्पिढ्या ती ते चोखपणे करीत आली आहे. घरातल्या कोणत्या व्यक्तीला नेमके कधी काय लागते, याचे लेखी वेळापत्रक तिच्याकडे भले नसेलही, पण ते तिला व्यवस्थित माहीत असते आणि त्यात तिच्याकडून कधीच चूक घडत नाही.
 
अन्न सुरक्षेमधील स्त्रियांची एकूण भूमिका महत्त्वाची असली तरी ग्रामीण महिलांना आपल्या तत्संबंधीच्या गरजा भागवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे स्वातंत्र्य मात्र कधीच मिळत नाही. विकसनशील देशांमधील परिस्थिती पाहिली तर सुमारे 70 टक्के महिला शेतीमध्ये मजुरी करतात आणि स्वाभाविकपणे त्या हलाखीच्या आर्थिकस्थितीत जगत असतात. जगभरातल्या प्रगतशील विचारांच्या अर्थतज्ज्ञांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, स्त्रियांच्या परिस्थितीकडे पाहून संबंधित देशाच्या सामाजिक, आर्थिकस्थितीचे दर्शन घडते. ते खरेही आहे. महिलांच्या कौशल्यांना वाव दिल्याशिवाय जगातील भूक आणि दारिद्र्य संपणार नाही. शिकलेली आई घर पुढे नेई, असे म्हटले जाते, त्यामागे तेच कारण असते. महिला सशक्तीकरण झाले, तर कुटुंबाचे आरोग्य सुधारेल. मुले शाळेत जातील. शेतीचे उत्पादन वाढेल आणि एकूण कुटुंबाचा आर्थिक स्तरही उंचावेल.

स्त्रिया शेतीत राबत असतात, परंतु त्यांच्या श्रमाचे मोल मात्र कधीच नीटपणे केले जात नाही. कारण शेतीतली महत्त्वाची कामे पुरुषमंडळी करीत असतात. त्यामुळे त्यांचे कष्ट दिसतात. स्त्रियांची शेतीतली राबणूक पुरुषांपेक्षा अधिक असूनही त्यांच्या कष्टाची मोजदाद केली जात नाही. तिचे कष्ट दुर्लक्षित केले जातात. आणि त्या कष्टाचे मोलही ठरवले जात नाही. म्हणूनच शेतीत पुरुषांपेक्षा अधिक राबणारी स्त्री काय काम करते, असा प्रश्न कुठल्या सरकारी अर्जामध्ये विचारलेला असतो, तेव्हा त्याचे उत्तर ‘शेती’ असे न देता ‘घरकाम’ असे लिहिले जाते.

बचत गटांची चळवळ जोमाने उभी राहिल्यानंतर मोठ्या संख्यने महिला त्यात सहभागी होऊ लागल्या आहेत. स्थानिक साधन संपत्तीच्या आधारे उत्पादन घेणे, हे बहुतेक बचत गटांच्या उत्पादनांचे सूत्र आहे. त्यामुळे प्रदेशनिहाय महिलांची उत्पादने वेगळी असतात. केवळ लघुद्योगासारखी छोटी उत्पादने न घेता थेट शेती करून उत्पादने घेण्यासाठीही महिला सरसावल्या असून पेरणीपासून काढणीपर्यंत सा-या जबाबदा-या महिला पार पाडू लागल्या आहेत आणि पुरुषांच्या मदतीशिवायही शेती करू शकतो, हे राज्यभरातील अनके ठिकाणच्या महिलांनी दाखवून दिले आहे. अनेक बचत गटांच्या महिलांनी फळप्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिले असून शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन त्या उद्योगाकडे वळल्या आहेत. यातून दिसते ती महिलांची नवे काही शिकण्याची, नवे काही करण्याची वृत्ती. पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणाची जोड देऊन शेतीच्या क्षेत्रातही नव्या वाटा निर्माण करण्याचे काम महिला करू लागल्या आहेत आणि बचत गटांच्या चळवळीमुळे हे साध्य होऊ लागले आहे. अलीकडच्या काळातील ही स्थित्यंतरे विचारात घेऊनच ग्रामीण स्त्रियांच्या स्थितीसंदर्भातील मांडणी करावी लागेल. विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या योगदानाचे मूल्यमापन करावे लागेल. 
Advertisements

Single Post Navigation

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: