Vasturaviraj

A Trusted name in Vastushastra

कल्पकतेवर आधारित उद्योग हवेत

नैसर्गिक साधनसंपत्तीची कमतरता भरून काढण्यासाठी ज्ञानाधिष्ठित आणि कल्पकतेवर आधारित उद्योग व्यवसायांची उभारणी करायला हवी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्योगक्षेत्राला केले. मॅक्सेल महाराष्ट्र कॉपोर्रेट एक्सिलन्स पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी एनसीपीए येथे झाले. महाराष्ट्र टाइम्स या कार्यक्रमाचा मीडिया पार्टनर होता.

पुरस्कार मिळवणाऱ्या प्रत्येकाचेच जीवन आदर्श आहे. सर्वांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी, असे सांगतानाच चव्हाण यांनी राज्याचे ब्रॅण्डिंग करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राने एखाद्या राष्ट्रासारखा विचार करायला हवा. लीडर व्हायला हवे. राज्यामधील प्रति व्यक्ती मिळकत ही इतरांपेक्षा अधिक आहे. उद्योग आणि आथिर्क क्षेत्रात पहिला क्रमांक कायम राहणार आहे. राज्याची विश्वासार्हता, दर्जा आणि या सकारात्मक बाबींचे ब्रॅण्डिंग करायला हवे, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्याच्या औद्योगिक धोरणात बदल केले जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. यापूर्वी मोठ्या उद्योगांच्या उभारणीला पाठबळ दिले जात होते, मात्र त्याचा विशेष फायदा झालेला नाही, हे लक्षात घेऊन पुढील धोरण राबवले जाईल. वस्त्रोद्योगात केलेल्या बदलांचे सकारात्मक बदल दिसत असल्याचेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

गौरवमूर्ती 
बोइंग इंडियाचे अध्यक्ष दिनेश केसकर आणि टाटा स्टीलचे एमडी हेमंत नेरूरकर यांना एक्सिलन्स इन बिझनेस लीडरशिप, निलेर्प ग्रुपचे राम भोगले, मुकुंद भोगले, नित्यानंद भोगले आणि डीएलझेड कॉपोर्रेशन, युएसचे अध्यक्ष विक्रम राजाध्यक्ष यांना एक्सिलन्स इन आंत्रप्रिनरशिप, क्विक हील टेक्नॉलॉजीचे सीईओ आणि एमडी कैलाश काटकर व संजय काटकर यांना एक्सिलन्स इन इनोव्हेशन आणि प्लाझ्मा टेक्नॉलॉजीच्या एमडी अरुंधती जोशी यांना इमजिर्ंग एक्सिलन्स पुरस्काराने गौरवण्यात आले.

परीक्षक मंडळ 
‘ कॉपोर्रेट एम अॅण्ड ए’चे वकील आणि संस्थापक सदस्य नितीन पोतदार, ज्येष्ठ संशोधक डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, एल अॅण्ड टी फायनान्स होल्डिंगचे अध्यक्ष वाय. एम. देवस्थळे, केरळ हायकोर्टचे माजी मुख्य न्यायाधीश अरविंद सावंत आणि कमोडिटी ट्रेडिंगचे तज्ज्ञ सुनिल देशमुख यांनी परीक्षक मंडळाचे काम पाहिले.

सकारात्मक वृत्ती हवी
अंधाराचा महासागर कितीही अथांग असला तरी त्यात प्रकाशाची बेटं असतात. या कुसुमाग्रजांच्या ओळी उद्धृत करून अशा प्रकाशाच्या बेटांवर आपण सकारात्मक वृत्तीने जायला हवे, असे सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर म्हणाले. मॅक्सेल जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. दारिद्य आणि कॅन्सरचा मुकाबला करत मी पुढे गेलो, असे त्यांनी सांगितले. जगातील २४० देशांपैकी आकाराच्या तुलनेत महाराष्ट्र १६९ देशांपेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार राष्ट्राप्रमाणे करायला हवा. १९९१नंतर इनोव्हेशनचे युग सुरू झाले. या युगात उत्पादनांसाठी गुणवत्ता वाढवण्याचा विचार केल्यास महाराष्ट्रात सुवर्णयुग येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Courtesy – http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13027727.cms

Advertisements

Single Post Navigation

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: